प्रशासन विभागाने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कर्मचारी वर्गाला पदोन्नोती बाबत न्याय दिला- सजंय जगदाळे
पदोन्नोती झालेल्या सर्वच कर्मचारी वर्गाचे अभिनंदन तसेच सह.आयुक्त लोणकर यांचे आभार
पिंपरी, प्रतिनिधी
पिंपरी चिचंवड महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथम महापालिकेच्या लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्याना न्याय मिळाला असून याचे सर्व श्रेय सामान्य प्रशासन विभागाचे सह.आयुक्त मनोज लोणकर साहेबांनाच जाते. असे सांगून लिपीक, मुख्य लिपीक, कार्यालयनीन अधिक्षक, उपलेखापाल पदी पदोन्नोती झालेल्या सर्वच महापालिका कर्मचारी वर्गाचे शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी अभिनंदन करुन सामान्य प्रशासन विभागाचे देखील आभार मानले आहेत.
मागील अनेक वर्षापासून लिपीक संवर्गाला या माहापालिकेत पदोन्नोती बाबत ताटकळत बसावे लागत होते. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना २३ वर्षानंतर मुख्य लिपीकांची पदोन्नोती मिळाली तर आनेक कर्मचाऱ्यांना त्या पुढील पदोन्नोती वाचूनच महापालिकेतून निवृत्त व्हावे लागले. त्यामुळे प्रशासन अधिकारी पासून ते सहा.आयुक्त पदावर राज्य शासनाचे अधिकारी येऊन बसले. त्यामुळे लिपीक संर्वागातील अनेक पात्र कर्मचाऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जाऊन त्यांच्यावर मोठा अन्याय केला गेला. हा अन्यायच सध्या च्या लिपीक कर्मचारी वर्गावर होऊ नये यासाठी लिपीक संवर्गिय हक्क परिषद सातत्याने लढा देत होती. या लढ्याला सुध्दा कुटेतरी यश आले आहे. व या नियुक्तीमुळे पुढील पदाच्या पदोन्नोत्या मिळण्याचा मार्ग देखील आता कुटेतरी मोकळा होईल याचे देखील समाधान वाटत असल्याचे परिषदेचे शहर अध्यक्ष संजय जगदाळे यांनी व्यक्त केले. तसेच या पदोन्नोती साठी जे जे घटक प्रयत्न करत होते त्या सर्व घटकांचे देखील मनापासून आभार जगदाळे यांनी मानले.

