किमान वेतन मिळत नसल्यास ईमेलद्वारे तक्रार करा, गणेश ताठे अँक्टीव्ह मोड मध्ये
किमान वेतनधारकांसाठी लवकरच टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरु करणार – गणेश ताठे
- किमान वेतन मिळत नसल्यास ईमेलद्वारे तक्रार करा, गणेश ताठे अँक्टीव्ह मोड मध्ये
नागपुर दि. प्रतिनिधी
असंघटीत व कंत्राटी कामगार वर्गाचा संस्थेकडून होणारा पिळवणूक व वाढत्या तक्रारी पाहता किमान वेतन मिळत नसल्यास ईमेलद्वारे तक्रार करण्याचे आवहान महाराष्ट्र राज्य किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा ) गणेश ताठे यांनी केले आहे.आमदार संजय केनेकर यांचे नेतृत्वाखालील भाजपा पदाधिकारी शिष्टमंडळाने नागपुर येथे केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री यांची भेट घेतली, त्यानंतर नागपुरात रवी भवन या शासकीय विश्रामगृहात भाजपा कामगार मोर्चा पदाधिका-यांची बैठक संपन्न झाली
महाराष्ट्रातील लाखो संघटित व असंघटित कामगारांना शासनाने जाहिर केलेनुसार किमान वेतन दिले जात नाही. याची शहनिशा करणेसाठी आणि त्रुटी आढळल्यास किमान वेतन मिळवुन देण्यासाठी शासन कटिबध्द असलेचे महाराष्ट्र राज्य किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा ) गणेश ताठे नागपुरात पत्रकारांशी बोलताना जाहिर केले.
किमान वेतन धारक कामगारांना दरमहा किमान वेतन मिळावे यासाठी ईमेलद्वारे व टोल फ्री नंबर द्वारे तक्रारी स्विकारण्यात येणार आहे, तक्रारीत तथ्य आढल्यास, संबधितांना न्याय देण्यात येईल, असे ताठे यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी, कामगार मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस हनुमंत लांडगे, अजय दुबे, प्रदेश सचिव भास्कर पराते, धनंजय वैद्य, तुळशीदास दुंडे, आशिष ढोमणे , संतोष त्रिवेदी, राजकुमार मामुलकर, राहुल कुशवाह, जयदेव लकडस्वार उपस्थित होते.
बैठकीत भाजपा कामगार मोर्चाचे नागपुर शहर आजी माजी अध्यक्ष खेमराज दमाहे, चंद्रशेखर म्हैसकर, नागपुर ग्रामीण चे अध्यक्ष रमेश भदादे, चंद्रपुर ग्रामीण अध्यक्ष उमेश बोडेकर आणि इतर अनेक विभाग, जिल्हा, मंडल पदाधिकारी उपस्थित होते.
किमान वेतम मंडळाचे अध्यक्ष गणेश ताठे यांनी वर्धा येथे जाऊन, जेष्ठ कामगार नेते आणि भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मिंलिद देशपांडे आणि जिल्हाध्यक्ष अभय नगरे यांची भेट घेऊन स्थानिक कामगार प्रश्नावर चर्चा केली.
—————–——————-
जाण व भाण असलेले व्यक्तिमत्व पदावर :;-
सामान्य कष्टकरी वर्गाची जाण व भाण असलेल्या व्यक्तिमत्वाला राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य किमान वेतन मंडळाच्या अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा ) पदी नियुक्त केले आहे.त्यामुळे निश्चित असंघटीत व कंत्राटी पध्दतीवर काम करनाऱ्या कर्मचार्यांना न्याय मिळनार आहे.तसेच गणेशजी ताठे यांना कामगार मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष असताना राज्यभरातील प्रत्येक तालुका पिंजूऩ काढल्यामुळे त्यांना कामगार वर्गाच्या सर्व परिस्थिती चा उत्तम अभ्यास आहे. त्याची निवड ही खरी कामगार प्रतिनिधीची निवड झाल्याबद्दल समाधान व आम्हांला आनंद होत आहे.
संजय जगदाळे,
कामगार प्रतिनिधी

