क्राईम

राष्ट्रतेज मंडाळाची सामाजिक जबाबदारीची परंपरा यंदाही कायम


 

गणेश विसर्जन मिरवणुकीत स्वदेशी वस्तूंचा करू स्वीकार, विदेशी वस्तूंचा करू धिक्काराचा दिला संदेश

नेहरूनगर,प्रतिनिधी

नेहरूनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये स्वदेशी वस्तूंचा करू स्वीकार, विदेशी वस्तूंचा करू धिक्कार,अशा घोषणा देत मंडळाच्या 36व्या वर्षी देखील सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम राखली आहे.

शहरात सदैव सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले मंडळ म्हनून नेहरूनगर मधील राष्ट्रतेज मंडळ शहराला परिचीत आहे. राष्ट्रहित व समाजहित पाहून या मंडळाने नेहमीच विवीध उपक्रम राबवले आहेत. मंडळाचे यंदाचे 36 वे वर्ष होते या वर्षी देखील मंडळाने स्वदेशी वस्तुचां नारा देत नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.

तसेच स्वदेशी व विदेशी वस्तूंची ओळख पटण्याकरिता विविध फलक बनवण्यात आले होते, ढोल ताशाच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणूक काढण्यात आली, यावेळी लहान मुलांपासून व वृद्धांपर्यंत नागरिकांचा मोठा सहभाग होता, तसेच विशेष करून महिलांचाही मोठा सहभाग होता, मंडळाला 36 वर्ष पूर्ण झाले, प्रत्येक वर्षी मंडळाचा समाजप्रबोधनात्मक देखावा असतो, पारंपारिक ढोल ताशाच्या गजरांमध्ये श्री गणेशाची मिरवणूक काढली जाते, संस्थापक बनसोडे, आधारस्तंभ, राजेंद्र मोडक,मंडळाचे अध्यक्ष श्री अजय संभाजी पाताडे, कार्याध्यक्ष मंगेश कुलकर्णी, सेक्रेटरी- सुनील सावंत, खजिनदार- अनिल सावंत, उपाध्यक्ष,अर्जुन बागायातकर, तसेच इतरही अनेक कार्यकर्ते मंडळाच्या विवीध उपक्रमासाठी परिश्रम घेत असतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *