ताज्या घडामोडी

पुण्यातही श्री भगवंत प्रकटोत्सव, दुसऱ्या वर्षात विविध कार्यक्रम


पुण्यातही श्री भगवंत प्रकटोत्सव, दुसऱ्या वर्षात विविध कार्यक्रम

पुणे – प्रतिनिधी
बार्शीत श्री भगवंत महोत्सव उत्साहात संपन्न होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रकटोत्सव दिनी भगवंत नगरीत उपस्थित राहणार आहेत. तर, श्री भगवंत महोत्सव मंडळ पुणे यांच्यातर्फे 28 एप्रिल रोजी श्री भगवंत जन्मोत्सव कार्यक्रमाचे पुणे शहरात देखील आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सारसबागेत तळ्यातील गणपती मंदिरात दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

 

पुण्यातील भगवंत महोत्सवाचे यंदा हे दुसरे वर्ष आहे. पुण्यात स्थायिक बार्शीतील नागरिकांच्या श्री भगवंत महोत्सव मंडळातर्फे विष्णूचे रूप आणि बार्शी येथे देशातील एकमेव मंदिर असलेल्या श्री भगवंत जयंतीनिमित्त भगवंत प्रकटदिन आणि भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे साडेपाच वाजता शोभा कोल्हे पुणे यांचे जन्म कीर्तन, साडेसहा वाजता भगवंत प्रकटोत्सव, त्यानंतर महाअभिषेक, महाविष्णूयाग, श्रीविष्णूसहस्रनाम, दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि महाआरती असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. उत्तरार्धात शुभांगी काळे, देवदत्त मोरे आणि श्री वेदपाठक यांचा सुगम व भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुण उन्हाळे यांनी दिली.

कार्यक्रमाचे नियोजन आणि वेळ

पहाटे ५.३० ते ६.३० वा. – सौ शोभा कोल्हे पुणे यांचे जन्म किर्तन
सकाळी ६.३० वाजता – गुलाल / फुले उधळून प्रकटोत्सव साजरा करणे
सकाळी ६.३५ ते ९.०० वा – श्रींच्या पादुकावर महाअभिषेक
सकाळी ९.३० ते ११.३० – श्री महाविष्णुयाग व श्रींच्या पादुकावर तुळशीपत्र व मोगरा पुष्प अर्पण
दुपारी १२ वा – नैवेद्य, महाआरती व महाप्रसाद ( बार्शीकर TV स्टार श्री समिर परांजपे यांचे हस्ते महाआरती)
दुपारी ३.३० ते ६.०० वा पर्यंत – पुणे स्थित कलाकार शुभांगी काळे, देवदत्त मोरे व वेदपाठक यांचा सुगम संगित व भक्ती गितांचा कार्यक्रम

सदर कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पुणेस्थित बार्शीकर, भगवंत भक्त उपस्थित राहतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *