क्राईमताज्या घडामोडी

मोशीतील शिवशंभो प्रतिष्ठानला मागील वर्षीचा शहरातील द्वितीय क्रमांकाचा “मोरया पुरस्कार”


मोशीतील शिवशंभो प्रतिष्ठानला मागील वर्षीचा शहरातील द्वितीय क्रमांकाचा “मोरया पुरस्कार”

मंडळाचे मागील 20 वर्षापासून विवीध सामाजिक उपक्रम

मोशी,प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या मोरया पुरस्कारामध्ये मोशीतील शिवशंभो गणेश मंडळाला मानाचा व्दितीय पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आले.

.ग.दि.माडगूळकर नाट्यगृह निगडी या ठिकाणी झालेल्या या पुरस्काराच्या सोहळ्यात पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थिती मध्ये या पुरस्काराचे वाटप करण्यात आले. शिवशंभो प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या निमित्ताने समाजाचे हित लक्षात घेऊन जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन आपली संस्कृती टिकली पाहिजे गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन झाले पाहिजे. स्वच्छतेची चळवळ उभी राहिली पाहिजे.सर्वांनी एकत्र येऊन हा गणेश उत्सव सण साजरा केला पाहिजे.समाजातील विविध क्षेत्रातील गरजूंना एकत्र घेऊन त्यांना मदतीचा हात या गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे हीच भावना मनामध्ये ठेवून गेली वीस वर्ष शिवशंभो प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जात आहे..पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोरया पुरस्काराने द्वितीय क्रमांकाने सन्मानित केल्यामुळे ही जबाबदारी अजूनच वाढलेली आहे.पुढील काळात सुद्धा समाजाची बांधिलकी म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन हा गणेशोत्सव असाच मोठ्या प्रमाणात साजरा करूया. आणि आपली संस्कृती व परंपरा जपूया.आम्ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित करण्याबरोबरच एका नवीन जबाबदारीची जाण निर्माण करून आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली त्याबद्दल शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे व दूरदृष्टी असणाऱ्या परीक्षकांचे देखील मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *