पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ग्राम विकासातील अभ्यासकांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार.. ॲड विकास जाधव यांची माहिती
ग्रामविकासाला चालना मिळेल…..
प्रतिनिधी,
ग्रामविकासासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या तसेच ग्रामीण विकासातील अभ्यासक अशा लोकांना पंचायत समिती व जिल्हा परिषद या सभागृहात काम करण्याची संधी मिळाल्याशिवाय रचनात्मक काम होणार नाही त्यामुळे महानगरपालिका व नगरपरिषदा व नगरपालिका मध्ये ज्या पद्धतीने स्वीकृत सदस्य घेतले जातात तसेच पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वीकृत सदस्य घ्यावे ही मागणी सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे संस्थापक सचिव ॲड विकास जाधव यांनी सातत्याने लावून धरली होती.

या मागणीसह विधान परिषदेत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यातून प्रतिनिधी पाठवावे किंवा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात मतदानाचा अधिकार द्यावा यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला होता सदर मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यासह संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे केलेली होती याची दखल घेऊन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेमध्ये पाच सदस्य तर पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्य घेण्यासाठी अधिनियमांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत विनंती केली आहे सदर मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी ग्रामविकास विभागास कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे सरपंच परिषदेच्या व ग्रामविकासात कार्यरत असणाऱ्या संस्था संघटनांच्या मागणीला यश मिळणार असल्याची भावना सरपंच परिषदेचे संस्थापक ॲड विकास जाधव यांनी व्यक्त केली सदर मागणी पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचीही यावेळी एडवोकेट जाधव यांनी सांगितले शहरा पेक्षा ग्रामीण भागाला सरकार स्थापत्यिक वागणूक देत असल्याची सातत्याने भावना व्यक्त होत होती तथापि अलीकडील काळात सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंचांना व उपसरपंचांना मानधन मिळवून देण्यापासून ते त्यामध्ये वाढ होण्यासाठी ॲड विकास जाधव व त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण संघर्ष केलेला आहे व त्यामध्येही यश आलेले आहे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्यांची मागणी पूर्ण होताना दिसत आहे त्यामुळे राज्यभरातून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यातून सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे व विशेषता संस्थापक सरचिटणीस ॲड विकास जाधव यांचे अभिनंदन होत आहेत

