राजकीयशहर

“प्राध्यापक नामदेवराव जाधव” म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या वृत्तीचा कर्दनकाळ तर निवडणूकीच्या तोंडावर शहरात झपाट्याने वाढत असलेले परिवर्तनाचं वादळ


 

प्रा.नामदेव जाधव यांची शहरात लोकप्रियता वाढली

  1. पिंपरी, प्रतिनिधी
    राज्यभर पावसाची चर्चा असली तरी पिंपरी चिंचवड शहरात फक्त आणि फक्त प्रा.नामदेवराव जाधव यांच्या निर्भिड कार्याचीच चर्चा सर्व घटकात गाजत आहे. त्यामुळे त्यानी शहरातील सर्वात जलद गतीने लोकप्रिय व्यक्ति होण्याचा मान देखील मिळवला आहे. नागरीकांना वेठीस धरणाऱ्या समस्या व त्याला कारणीभूत असलेल्या महापालिका प्रशासकाची चुकीच्या कार्यपध्दतीची पुराव्यासह अभ्यासपुर्ण पोस्टमार्टम करुन अधिकारी वर्गाची बोलती बंद करत असल्यामुळे ते नागरीकांच्या पसंतीस उतरले आहेत.
    प्रा.नामदेवराव जाधव म्हणजे राजमाता जिजाऊ यांचे वंशज, लेखक, व्याख्याते अशी ओळख असलेले जाधव आता एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्यात नावा रुपाला येत आहेत. त्याला कारणीभूत ठरत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व तेथील अधिकारी वर्गाचा प्रा.जाधव उघड करीत असलेला भ्रष्टाचार. गेली साडे तीन वर्ष राज्या बरोबरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देखील प्रशासकीय राजवट चालू आहे. शेखर सिंह हे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून समजली जाणारी महापालिका या प्रशासकीय राजवटीत कर्जबाजारी झाली असून नागरीक हे अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. असे असताना सत्ताधारी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी गप्प आहेत तर विरोधी ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी व कॉग्रसे यांनी सुध्दा शहरातील समस्या बाबत नागरीकांना वाऱ्यावर सोडले आहे. हे जनता महापालिकेच्या निवडणूकीत विसरणार नाही. डीपी टीपीच्या नावाखाली शहरातील सामान्य कष्टकरी वर्गाच्या घरावर आरक्षणे टाकून त्यांना आयुष्यातून उठवण्याचे काम महापालिका आयुक्त करत आसल्याचा आरोप त्यांच्यावर होत असताना नागरीकांच्य मदतीला फक्त प्रा. जाधव सर येत आहेत. यामुळे त्यांची लोकप्रियता शहरात व राज्यात देखील दिवसेन दिवस वाढत आहे. तर शहरातील आमदार, खासदार, नगरसेवक मात्र टिकेची धनी होत आहेत. प्रा. जाधव हे त्यांच्या हजरजबाबी प्रश्नामुळे अधिकारी वर्गांची बोलतीच बंद करत असल्यामुळे भ्रष्टाचारी घटकाचे सध्या ते कर्दनकाळ असून, महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शहरातील एक परिवर्तनाचे ते वादळ ठरतील अशी चर्चा नागरीकातून होत असून, याकडे राजकीय जाणकार लक्ष ठेवून आहेत.
    —————————————————————
    40 टक्के रस्ता 60 टक्के फुटपाथ संपूर्ण शहराची भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लावली वाट-

सध्या येथील शहराची, शहरातील रस्त्याची व पर्यायाने वाहतूकीची व प्रवाशांच्या सोयीची कशी वाट लावली जातेय हे शहरातील रस्ते व रस्त्यावर बांधलेले फुटपाथ यावरुन लहान मुलाला देखील पटकन लक्षात येईल. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यां का येत नाही याचे उत्तर या कामातील भ्रष्टाचारात आहे. पण याभ्रष्टाचारामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कंपन्या बाहेर जाऊन शहरातील रोजगार कमी होत आहे. शहरातील वैभव कमी होत आहे. शहरातील प्रत्येक चौकात एक एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामुळे पुढील दोन वर्षात हे शहर नागरीकांना राहण्याजोगे राहणार नाही. याला फक्त येथील अरुंद रस्ते व महापालिका आणि राजकीय वर्गाचे बिल्डरधार्जिण धोरण येथील नागरीकांच्या मानगुटीवर बसलेले डिपी, टीपी प्लॅन. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणूकीत कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाला थारा न देता स्थानिक विकस आघाडीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या सारख्या निर्भिड व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या सर्वसमावेशक न्याय तत्वावर चालणाऱ्या वन मॅन आर्मीची गरज आहे.

छाया सोळंके-जगदाळे
अध्यक्षा,पिंपरी चिचवड शहर परिवर्तन विकास आघाडी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *