क्राईम

चिंचवड येथे रविवारी आमदार सुरेश धस यांचा आभार दौरा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मराठवाडा युवा मुंचाचे अध्यक्ष बंटी सगळे, उद्योजक बंडु तोडकर यांचे आवाहन


चिंचवड येथे रविवारी आमदार सुरेश धस यांचा आभार दौरा
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मराठवाडा युवा मुंचाचे अध्यक्ष बंटी सगळे, उद्योजक बंडु तोडकर यांचे आवाहन

पिंपरी चिंचवड: बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील बहुसंख्य नागरिक व्यवसाय, नोकरी निमित्ताने पुणे शहरातील विविध भागात दाखल झाले. आपल्या मतदार संघात अश्या मतदारांच्या गाठी भेटी, व आपल्या मतदार संघात सुरु असलेल्या कामाचा लेखा जोखा मांडण्यासाठी तसेच सर्वांचे आभार मांडण्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार सुरेश (आण्णा ) धस स्वतः उपस्थित रहाणार आहेत. तरी या पुणे आभार दौऱ्यास आष्टी पटोदा, शिरूर मतदार संघतील नागरिकांनी तसेच आमदार सुरेश आण्णा धस यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्याला पुणे जिल्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा युवा मंच अध्यक्ष बंटीशेठ सगळे व उद्योजक बंडुशेठ तोडकर यांनी केले आहे
यावेळी आयोजक बंटी सगळे म्हणाले की, मराठवाड्यातील आष्टी,पाटोदा, शिरूर मतदारसंघातील जनतेच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार सुरेश आण्णा धस हे पुणे शहरातील चिंचवड येथे येत आहेत. यानिमित्ताने रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे येथे जनतेशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात , मतदारसंघातील विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षांबाबत चर्चा होईल.
आमदार सुरेश आण्णा धस यांनी नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य दिले असून, त्यांच्या या भेटीमुळे पुण्यातील मराठवाड्याच्या जनतेशी त्यांचा संवाद अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे. असे आयोजक बंटी सगळे तसेच उद्योजक बंडु तोडकर,वलवळे राजेंद्र, दादा चौधरी, अनिल टेकाळे, इंद्रजित पवार यांच्यासह पुणे शहरातील प्रमुखांनी केले आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *