महाराष्ट्रशहर

शाळेतील मुख्याध्यपक पदोन्नोती बाबत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष


 

शाळेतील मुख्याध्यपक पदोन्नोती बाबत पिंपरी चिंचवडमहापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
संजय जगदाळे यांची राज्याच्या शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे तक्रार

पिंपरी, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शाळेतील अनेक शाळा या मुख्याध्यापक विना सुरु असून शैक्षणिक गुणवत्ता व व्यापक धोरणाच्या कामकाजाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रीयेला खील बसत असून शाळेतील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या बाबत महापालिका शिक्षण विभाग पात्र शिक्षकांना मुख्याध्यपक पदाची पदोन्नोती देणेबाबत गंभिर नाही. यामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होत असून अनेक शाळा या मुख्याध्यापक विनाच सुरु असल्यामुळे शाळेतील शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना देखील अनेक समस्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे पात्र शिक्षकांना मुख्याध्यापक पदाची पदोन्नोती देण्यात यावी अशी मागणी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय(बापू) जगदाळे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.

सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शाळेत विद्यार्थांची संख्या वाढत आहे. यामुळे महापालिकेला शाळेचे वर्ग कमी पडत सून काही भाग शाळा महापालिका प्रशासनाने सुरु केल्या आहेत. यातच अनेक मुख्याध्यापक हे निवृत्त झाले असल्यामुळे महापालिकेच्या अनेक शाळा या मुख्याध्यापक विनाच सुरू आहेत. या बाबत सामाजिक कार्यकर्ते व पालक वर्गातून नाराजीचा सुरु येत असून शिक्षक वर्गांना देखील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मोठी अडचण येत आहे. त्याबरोबरच अनेक भाग शाळांना मान्यता मिळालेल्या नसुन या शाळा डिजीटल होण्याबाबत ही विलंब होत आहे. या सर्वांचा परिणाम कष्टकरी वर्गाच्या पाल्यांवर होत आहे. या बाबत महापालिका प्रशासनाला अवगत करुन देखील या बाबत महापालिका शिक्षण प्रशासन ठोस भुमिका घेत नसल्यामुळे अनेक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग वेठीस धरला जात असून अनेक समस्यांला तोंड देत असल्याचे संजय जगदाळे यांनी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या निदर्शणास सर्व प्रकार आणून मुख्याध्यापक वर्गाच्या नियुक्त्या लवकर करण्यात याव्या अशी मागणी केली आहे. या बाबत योग्य ती कर्यावाही लवकरच केली जाईल असा विश्वास शिक्षण मंत्र्याकडून व्यक्त केला असल्याचे जगदाळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *