सोलापूर-मराठवाडयाच्या मदतीसाठी रुपीनगर वासीय सरसावले
शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार,चार दिवस मदत केली जाणार गोळा
रुपीनगर,प्रतिनिधी
मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील काही गावात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे जीवन असाह्य झाले आहे.त्यांच्या समस्या पाहता रुपीनगरमधील महिला-भगिनी व पुरूष मंडळीने एकत्र येऊन घरो घरी जाऊन नागरिकांकून स्वइच्छेने जमेल ते साहित्य व अन्न, धान्य गोळा केले आहे. सदर ही मदत अजून चार दिवस गोळा केली जाणार असून गोळा झालेली मदत ही सोलापूर व मराठवाडा येथील शेतकरी,शेतमजूर वर्गांना गावात जाऊन देण्यात येणार आसल्याचे संयोजकांनी सांगितले.

यामध्ये नागरीकांना जीवनावश्यक असलेले अन्न,धान्य,कपडे तसेच इतरही साहित्य गोळा केले जाणार आहे. चार दिवसा मध्ये गोळा झालेली सर्व मदत ही सोलापूर व मराठवाडा येथील अतिवृष्टीग्रस्त गावात जाऊन शेतकरी,शेतमजूर व गावकऱ्यांना दिली जाणार आहे.
या सामाजिक उपक्रमात यांचा होता सहभाग:-
सुजाता काटे यांच्यां पुढाकाराने सुरू केलेल्या या उपक्रमत सुमेधा ढाकणे ,दीपा खेडकर अर्चना शिरसाट आकांक्षा सानप
रतन सानप संदिप जाधव,सुनील (देवा) रावताळे,साईनाथ ढाकणे,दिनेश नन्नवरे, भागवत शिंदे, विठ्ठल भोरे पाटील,
ऋषिकेश सुरवसे,सोहम शिरसाट, आशितोष मिसाळ, सिद्धांत शिरसाट ,हर्षद वाघमारे, विशाल उगलमूगले आदी शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्तेनी सहभाग घेतला आहे. या सर्वांना नागरीकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच वरील सर्वच व्यक्तिंनी स्वतः देखील भरीव मदत केली आहे. त्यांच्या या उपक्रमा बाबत सोलापूर मराठवाडा विकास परिषदेने सर्वांचे आभार मानले आहेत.


