ताज्या घडामोडी

सोलापूर-मराठवाडयाच्या मदतीसाठी रुपीनगर वासीय सरसावले


 

शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार,चार दिवस मदत केली जाणार गोळा

रुपीनगर,प्रतिनिधी
मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील काही गावात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे जीवन असाह्य झाले आहे.त्यांच्या समस्या पाहता रुपीनगरमधील महिला-भगिनी व पुरूष मंडळीने एकत्र येऊन घरो घरी जाऊन नागरिकांकून स्वइच्छेने जमेल ते साहित्य व अन्न, धान्य गोळा केले आहे. सदर ही मदत अजून चार दिवस गोळा केली जाणार असून गोळा झालेली मदत ही सोलापूर व मराठवाडा येथील शेतकरी,शेतमजूर वर्गांना गावात जाऊन देण्यात येणार आसल्याचे संयोजकांनी सांगितले.

यामध्ये नागरीकांना जीवनावश्यक असलेले अन्न,धान्य,कपडे तसेच इतरही साहित्य गोळा केले जाणार आहे. चार दिवसा मध्ये गोळा झालेली सर्व मदत ही सोलापूर व मराठवाडा येथील अतिवृष्टीग्रस्त गावात जाऊन शेतकरी,शेतमजूर व गावकऱ्यांना दिली जाणार आहे. या सामाजिक उपक्रमात सौ. सुजाता (मामी)काटे,महिला अध्यक्षा, मराठवाडा युवा मंच,सौ. सुमेधा( ताई )साईनाथ ढाकणे अध्यक्षा (सामाजिक कार्यकर्त्या,)सौ. दीपा ताई खेडकर,सौ. अर्चना ताई शिरसाटसौ. आकांक्षा ताई सानपश्री रतन लिंबाजी सानप,श्री. संदिप भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते, जनसेवक (शिवसेना संघटक भोसरी विधानसभा),श्री. सुनील (देवा) रावताळे(शिवसेना वैद्यकीय कक्ष,सा. कार्यकर्ते)श्री साईनाथ महादेव ढाकणे (भोसरी विधानसभा समन्वयक) अध्यक्ष: दि. लो. गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रतिष्ठान श्री. दिनेश नन्नवरे, श्री, भागवत शिंदे, श्री. विठ्ठल भोरे पाटील,श्री.ऋषिकेश सुरवसे,सोहम शिरसाट, आशितोष मिसाळ, सिद्धांत शिरसाट ,हर्षद वाघमारे, विशाल उगलमूगले आदी शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्तेनी सहभाग घेतला आहे. या सर्वांना नागरीकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच वरील सर्वच व्यक्तिंनी स्वतः देखील भरीव मदत केली आहे. त्यांच्या या उपक्रमा बाबत सोलापूर मराठवाडा विकास परिषदेने सर्वांचे आभार मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *