राजकीय

“तुमच्यासाठी खूप खाल्ल्या लाठ्या, झिजले चप्पल-जोडे, आता निर्णय तुमचाच नाही, निवड ठरली – अशोक (मामा) बनसोडे!” मतदारांच्या भावना


 

अशोक (मामा) बनसोडे यांच्या पहिल्याच प्रचार फेरीने मतदारांचा कौल स्पष्ट?

नेहरूनगर | प्रतिनिधी : अमित देशमुख

प्रभाग क्रमांक 9 मधील राजकारणाला पहिल्याच प्रचार फेरीत प्रचंड धक्का देत सामाजिक कार्यकर्ते व हजारो मतदारांच्या अस्मितेचे प्रतिनिधी अशोक (मामा) बनसोडे यांनी मैदानात आक्रमक एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच फेरीत प्रभागातील वातावरण तापले असून, राजकीय गणिते बदलण्याची सुरुवात झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.

मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या हजारो मतदारांचा विश्वास, हक्क आणि स्वाभिमान घेऊन मैदानात उतरलेल्या अशोक बनसोडे यांच्या स्वागतासाठी नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या फेरीने केवळ प्रचार नव्हे, तर जनतेचा आक्रोश आणि बदलाचा निर्धार व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असतानाही आमदार पुत्रामुळे तिकीट कापले गेल्याने नेहरूनगर परिसरात तीव्र नाराजी उसळली आहे. यामुळे “पक्ष नाही, माणूस महत्त्वाचा” हा संदेश जनतेने थेट रस्त्यावर उतरून दिला. हजारो समर्थक अशोक (मामा) बनसोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र या प्रचार फेरीत स्पष्ट झाले.
————————————–

तब्बल 23 हजाराहून अधिक मतदारावर पडू शकतो प्रभाव :-

या प्रभागात मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी मतदारांची संख्या तब्बल २२ हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. यातील निम्म्य मतदारांनी जरी अशोक बनसोडे यांना साथ दिली तरी बनसोडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र गेल्या ४० वर्षांपासून हे मतदार केवळ आश्वासनांवर जगत आहेत. मूलभूत प्रश्न, रोजगार, शिक्षण, घर, ओळख — कोणत्याच समस्यांवर ठोस तोडगा काडलेला नाही.
येथील अनेक तरुण आजही बेरोजगार आहेत. शिक्षणाची आवड असूनही आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना स्वप्नांवर पाणी सोडावे लागत आहे. अनेक राजकीय घटकांनी केवळ मतांसाठी वापर करून घेतले, दिशाभूल केली, असा गंभीर आरोप या फेरीत सहभागी झालेल्या महिलांनी केला.
“खूप खस्ता खाल्ल्या, चप्पल झिजल्या; पण आमचा ठावठिकाणा कोणीच दिला नाही. आता मात्र आम्हाला आमचा हक्काचा प्रतिनिधी हवा आहे. कोण काय म्हणो, यावेळी आम्ही अशोक (मामा) बनसोडे यांनाच सभागृहात पाठवणार!” — असा ठाम निर्धार महिलांनी आणि नागरिकांनी व्यक्त केला.

———————————-

 

हा लढा सर्वसामान्यांच्या अस्तित्याचा:-

पहिल्याच प्रचार फेरीतून स्पष्ट झाले आहे की, निवडणुकीचा नाही, तर अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि न्यायाचा आहे.
नेहरूनगरमध्ये बदलाची लाट उसळली असून, येणाऱ्या दिवसांत राजकीय वर्तुळात मोठे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *