ताज्या घडामोडी


पत्नीचा उमेदवारीशी कोणताही संबंध नाही – अनिल भालेकर
रूपीनगर | प्रतिनिधी
मी भारतीय जनता पार्टी व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांचा कट्टर कार्यकर्ता असून, पक्षाने ज्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे, त्या उमेदवारांचेच मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे, असे स्पष्टीकरण भाजपा कार्यकर्ते अनिल भालेकर यांनी दिले आहे.
‘एकसत्ता’ डिजिटल बुलेटिनमध्ये माझ्या पत्नीचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून प्रसिद्ध झाले असून ही माहिती पूर्णतः चुकीची व दिशाभूल करणारी आहे. माझ्या पत्नी अस्मिता भालेकर यांचा कोणत्याही प्रकारे उमेदवारीशी अथवा राजकीय इच्छुकतेशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


अनिल भालेकर पुढे म्हणाले की, आम्ही दोघे पती-पत्नी सध्या भाजपाच्या अधिकृत पूर्ण पॅनलचा प्रचार करत आहोत. आमदार महेशदादा लांडगे यांनी केलेली भरीव विकासकामे तसेच प्रभागातील सर्व उमेदवारांची लोकप्रियता यामुळे मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“येत्या निवडणुकीत भाजपाचाच पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” असा ठाम दावा अनिल भालेकर यांनी यावेळी केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *