प्रभाग क्रमांक ८ मध्ये कष्टकरी वर्गाला लोक प्रतिनिधिच नाही सत्ताधाऱ्यांच्या जात-पात राजकारणामुळे विकास ठप्प
बालाजीनगरमधील हजारो मतदार विकासापासून वंचित – जावेद शहा यांचा सत्ताधाऱ्या वर घणाघाणत
बालाजीनगर, प्रतिनिधी
“सामान्य कष्टकरी मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला या शहराच्या विकासप्रवाहात सामील होण्याचा अधिकार नाही का?” असा थेट सवाल उपस्थित करत, बालाजीनगरमधील हजारो नागरिक आजही विकासापासून वंचित असण्यास सत्ताधारी नगरसेवकच पूर्णपणे जबाबदार आहेत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे बालाजीनगरच्या जनतेच्या राहणीमानात कोणतीही सकारात्मक सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता फक्त चेहरा नव्हे, तर कारभार बदलण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत जावेद शहा यांनी मांडले.
यावेळी त्यांनी नागरिकांना थेट आवाहन करत सांगितले की,
“कोणत्याही प्रमुख पक्षाच्या दबावाला बळी न पडता मला आणि माझ्या ‘कपबशी’ या निशाणीला मतदान करा. बालाजीनगरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला विजयी करा.”
असे अवहान उमेदवार जावेद शहा यांनी केले.
—————————
बालाजीनगरमधील संतप्त नागरिकांचा सूर पाहता, या वेळी परिवर्तनाची लाट उसळणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. तर निश्चितच या प्रभागात परावर्तन अटळ आहे. व या परिवर्तनाचा केंद्रबिंदू माझा मराठवाडा सोलापूर जिल्हयातील मतदारच राहणार आहे. कारन हा पक्ष सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधित्व जसे करतो तसे मराठवाडा,सोलापूर, विदर्भ मधील मुळ रहिवाशांचे देखील प्रतिनिधीत्व पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी करत आहे. त्यामुळे च जावेद शहा यांना प्रचंड मतानी निवडून दया. करन ही लढाई फक्त विजयासाठी नाहीतर भावी पिढी स्वाभिमानी,आत्मसन्मान न स्वलंबी बनवण्यासाठी सुध्दा आहे.
छाया सोळंके-जगदाळे
अध्यक्षा,पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी

